माझी कविता

मनातले भाव शब्दांत रेखाटताना का पडती शब्द अपुरे ..?मनातील भावनांना अन लोचनांना शब्दांची भाषा कळत नाही ...., हेच खरे!!

More About Me...

.

Monday, October 30, 2006

निश:ब्द ही संध्याकाळ - मॄत्यु

http://mallinathk.majhyakavita.com/files/2008/06/337071afie_w.thumbnail.jpg
मॄत्युनिश:ब्द ही संध्याकाळ

निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

सरकली सुर्यकिरणे पाण्यावरुन,
पाणी संधेच्या वा-याने झुळझुळते.
होतं सुखी ऊन त्या पाण्याच्या कुशीत,
आता पाण्याचा विरह अंग-अंग त्याचा जाळते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

बिलगली पिकली पाने धरतीला,
त्याचं मातीत विलिन होणे राहते.
सुकली काही फ़ुले,
कोणी पाकळ्या पाकळ्याने जग सोडते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

पिकले माझ्याही आयुष्याचे पान,
हवेचा एका झोक्यानेही अश्यावेळी निभावते.
निश:ब्द ही संध्याकाळ
’येईल रात्र’ म्हणुन वाट केव्हाची पाहते.

1 comments:

Post a Comment

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More